आमच्याविषयी

ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंध शाळा, कोल्हापूर ही दृष्टिहीन मुलांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी समर्पित शाळा आहे. आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना आधार देणारे आणि प्रोत्साहनात्मक शिक्षण वातावरण उपलब्ध करून दिले जाते. प्राथमिक शिक्षण, वैयक्तिक लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो. आमचे ध्येय मुलांना आत्मविश्वासू, स्वावलंबी आणि समाजातील सक्षम नागरिक बनवणे आहे.


पालक मेळावा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांच्या महत्त्वपूर्ण सहभाग असतो. वर्षातून दोन वेळा पालक मेळावा आयोजित केला जातो. विद्यार्थ्यांना त्यांचे काम स्वतंत्रपणे करता यावे, यासाठी पालकांना आपल्या पाल्याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. तसेच तज्ज्ञ व्यक्तीकडून पालकांना मार्गदर्शन केले जाते. अंध मुले व सर्वसामान्य मुले यामध्ये मुळीच फरक नाही, हे समजून सांगितले जाते.

भविष्यातील योजना

शाळेसाठी भव्य इमारत, कार्यशाळा, उद्योग केंद्र, सर्व अपंगांसाठी पोहण्याचा तलाव, भव्य क्रीडांगण, स्वतंत्र वसतिगृह इत्यादी.

ठळक वैशिष्ट्ये

  • संस्थेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार सन २००६–०७ साली प्राप्त.
  • संस्थेला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र, नाशिक यांच्यावतीने आदर्श संस्था पुरस्कार सन २०१०.
  • श्री. वसंत रघुनाथ सुतार (विशेष शिक्षक) यांना राज्यस्तरीय अपंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल १९९९–२००० चा पुरस्कार.
  • कु. महेश मधुकर पवार व कु. अनिता हिंदुराव नायकवाडी यांनी ब्रेलमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली आहे.
  • शाळेचे व्याख्यान कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा इत्यादी ठिकाणी कार्यक्रम झाले.
  • शाळेच्या व्याख्यानाची नोंद केंद्रीय विद्यालयामध्ये घेण्यात आली आहे.
    •  शिक्षण

      ही ७ ते १८ वयोगटातील मुला–मुलींसाठी विशेष शाळा आहे. १ ली ते ४ थी अध्यापक शिक्षण, ५ वी ते १० वी एकात्मिक शिक्षण (हायस्कूल). सध्या १ ली ते १० वी ५७ विद्यार्थी वसतिगृहात आहेत.

       शैक्षणिक साधने

      ब्रेल लेखन पाटी, गणित पाटी, अबॅकस, स्लेट, ब्रेल क्रमिक व इतर पुस्तके, टेपरेकॉर्डर, गतिशीलतेसाठी पांढरी काठी, संगणक.

       खेळाची साधने

      शाळी, खो-खो, कुस्ती, लॉंगजंप, थ्रोबॉल, क्रिकेट सेट इत्यादी.

       पुनर्वसन

      विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने संस्थेचा प्रयत्न सुरू असतो. एस.एस.सी. नंतर विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणासाठी मुंबई व पुणे येथे पाठविले जाते. तसेच व्यवसाय मार्गदर्शन केले जाते. अंध मुलांचे विवाह करून त्यांचे पुनर्वसन केले जाते.

       सुसंस्कार वर्ग

      शाळेत विद्यार्थ्यांचा मानसिक, सामाजिक व बौद्धिक विकास केला जातो. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी बालपणापासून सुसंस्कार वर्ग चालविले जातात. या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाते.

       सांस्कृतिक उपक्रम

      अंधांचे प्रेरणास्थान लुई ब्रेल व हेलन केलर जयंती, जागतिक पांढरी काठी दिन तसेच राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते व विविध पद्धतीचे सण साजरे केले जातात. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या मुलांचे वाढदिवस साजरे केले जातात.

       सहल

      मुलांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून सहल आयोजित केली जाते. मुलांना स्पर्श वर्णनातून व प्रत्यक्ष काही गोष्टींचा अनुभव देऊन ज्ञान दिले जाते. ऐतिहासिक, भौगोलिक माहिती मुलांना देण्याच्या दृष्टीकोनातून सहलीचे नियोजन केले जाते. पन्हाळा, जोतीबा, गणपतीपुळे, रायगड, डोंबिवली, शिवाजी विद्यापीठ, साखर कारखाने, जादूघर, दुग्ध प्रकल्प, वॉटर पार्क, स्नो वर्ल्ड, समुद्र इत्यादी.

       क्रीडा स्पर्धा

      शाळेमध्ये मुलांच्या शारीरिक विकासासाठी शाळेत स्पर्धा घेतल्या जातात. तसेच शाळेच्या वतीने व इतर संस्थांनी घेतलेल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला जातो. तसेच राष्ट्रीय स्तरावर विकास मंडळामार्फत जाणे धावणे व चाचीत बांधणे ध्वज धावणे या स्पर्धांमध्ये त्यांची प्रथम क्रमांकाची निवड झाली आहे.

       बौद्धिक स्पर्धा

      राष्ट्रीय दृष्टिहीन संघटनेवतीने घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ब्रेल लेखन, वाचन, सामान्यज्ञान, वक्तृत्व, निबंध, संगीत, गायन–वादन, बुद्धिबळ इत्यादी स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.

       संगीत

      विद्यार्थ्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रगतीसाठी अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालय, मुंबई यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या गायन–वादन, तबला परीक्षेसाठी बसविले जाते. विद्यार्थ्यांना प्रारंभिक ते विशेष पदवी शिक्षण दिले जाते.